रेल्वेमध्ये बर्थ पडल्याने प्रवाशाचा मृत्यू

गुरूवार, 27 जून 2024 (12:13 IST)
रेल्वेमध्ये अंगावर बर्थ कोसळल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात खराब सीट मुळे घडला आहे. यावर खूप चर्चा सुरु आहे, 
 
मिळालेल्या माहितीनुसार अंगावर बर्थ कोसळल्याने एका व्यक्तीचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला आहे. तसेच रेल्वेचे पीआरओ म्हणाले की, एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस मध्ये झालेल्या या दुर्घटनेचे कारण खराब बर्थ नाही तर रेल्वेने सांगितले की, अधिकारींनी चौकशी केल्यानंतर समोर आले की, त्यावर बसलेल्या व्यक्तीने वरील बर्थच्या चेनला व्यवस्थित लॉक केले नव्हते, ज्यामुळे हा अपघात घडला आहे 
 
पीआरओ ने सांगितले की, रेल्वे अधिकारींना प्रवाशी जखमी झाल्याची सूचना मिळाली. त्यानंतर रामागुंडम स्टेशन वर ड्यूटी वर हजर असलेले स्टेशन मास्टर ने लागलीच 108 अँब्युलन्सची व्यवस्था करून रामागुंडम मध्ये रेल्वे पाठवली. प्रवाशाला रुग्णालयात पाठवण्यात आले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती