वीज संकट: देशातील अनेक राज्यांमध्ये वीज संकट ,दोन ते आठ तासांची कपात

शनिवार, 30 एप्रिल 2022 (11:28 IST)
देशातील अनेक राज्यांमध्ये लोकांना वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. कडक उष्मा आणि कोळशाचा तुटवडा यामुळे हे घडत आहे. वीज प्रकल्पांमध्ये कमी उत्पादनामुळे राज्ये प्रचंड मागणी पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत आहेत.वीजपुरवठा खंडित होण्याचा सर्वाधिक फटका कारखान्यांना बसतो. देशात मार्च महिन्यातील विक्रमी उष्म्यानंतर एप्रिलमध्येही उन्हाचा कडाका कायम आहे. अशा स्थितीत विजेच्या मागणीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.
 
बातमीनुसार, देशातील एकूण वीज संकट 623 दशलक्ष युनिट्सवर पोहोचले आहे. मार्चमधील एकूण वीजटंचाईपेक्षा हा आकडा अधिक आहे. या संकटाचा केंद्रबिंदू कोळशाचा तुटवडा आहे. देशातील 70 टक्के वीज कोळशातून निर्माण होते. मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा कोळसा उपलब्ध असल्याचा दावा सरकार करत आहे, परंतु वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा नऊ वर्षांतील सर्वात कमी आहे. याशिवाय, युक्रेन-रशिया युद्धामुळे कोळशाच्या आयातीत घट आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा किमतीत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत देशातील अनेक राज्यांमध्ये लोकांना वीज कपातीचा सामना करावा लागत आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती