टोकियोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यात फलदायी चर्चा

Webdunia
मंगळवार, 24 मे 2022 (21:18 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौर्‍याच्या दुसर्‍या दिवसाची सुरुवात क्वाड समिटने झाली. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या जपान दौर्यावर आले आहेत. टोकियोमध्ये क्वाड लीडर्स समिट दरम्यान, पंतप्रधान मोदींनी त्यांचे जपानी समकक्ष फुमियो किशिदा, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान अ‍ॅथनी अल्बानीज यांच्याशी प्रदेशाच्या विकासाबद्दल आणि परस्पर हितसंबंधांच्या जागतिक मुद्यांवर विचार विनिमय केला. क्वाडमध्ये चीनशी सामना  करण्याची रणनीतीही क्वाडमध्या बनवण्यात आली होती. पंतप्रधान मोदी आज संध्याकाळीच भारताला रवाना झाले आहेत. सोमवारी त्यांनी जपानी सीईओची भेट घेतली आणि भार‍तीय डायस्पोराशक्ष संवाद साधला.  
 
 
 
Koo App

संबंधित माहिती

पुढील लेख