आम्हाला चुकीच्या मार्गाचा अवलंब करण्याची गरजच नाही

बुधवार, 26 जून 2019 (10:06 IST)
देशातील जनतेने आम्हाला इतकं भरभरून दिलंय की आम्हाला चुकीच्या मार्गाचा अवलंब करण्याची गरजच नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना बोलत होते. यावेळी मोदींनी आधुनिक भारताच्या निर्मितासाठी आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. 
 
या भाषणात नरेंद्र मोदी यांनी आणीबाणी, समान नागरी कायदा, शहाबानो प्रकरण आदी मुद्द्यांचा उल्लेख करत काँग्रेसवर तोफ डागली. त्यांनी म्हटले की, काँग्रेसने देशाच्या प्रगतीच्या मुद्द्यावरही भेदभाव केला. जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था ११व्या स्थानावर पोहोचली, तेव्हा संसदेत आनंद व्यक्त गेला. मात्र, काही दिवसांपूर्वीच हीच भारतीय अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावर पोहोचली तेव्हा यापैकी काहीच घडले नाही. त्यामुळे तुम्ही इतक्या उंचावरही बसून राहू नका की, खालचे काहीच दिसणार नाही, असा अप्रत्यक्ष टोला नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लगावला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती