आफ्रिका देशातून कुख्यात गँगस्टर, अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी (Ravi Pujari) सेनेगल पोलिसांना चकवा देत दुसऱ्या देशात पळाला असून, रवी पुजारीला 21 जानेवारी 2019 रोजी पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल देशातील पोलिसांनी पकडले होते. नंतर स्थानिक न्यायालयाने रवी पुजारीला जामीन दिला, मात्र त्यांनी त्याने सेनेगलमधून रस्त्याच्या मार्गाने दुसऱ्या देशात पळ काढण्यात यश मिळवलं असून, वृत्ताला सेनेगल सरकारकडून अद्याप अधिकृत कोणताही दुजोरा मिळाला नाही. तर इंग्रजी वृत्तपत्र ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. भारताच्या ताब्यात असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनही अशाच प्रकारे 2000 साली बँकॉकमधून पळून गेला होता. त्यामुळे रवी पुजारीने छोटा राजनचीच आयडिया वापरल्याची चर्चा सुरु आहे. रवी पुजारी विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस असून, आपल्या देशात पुजारीविरोधात 200 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांमुळे कोणत्याही स्थितीत तो आपल्या देशाला हवा आहे. फसवणूक, खंडणी, हत्या असे अनेक गंभीर गुन्हे रवी पुजारीवर दाखल आहेत.