Dehradun news : PM मोदींच्या बहिणीने CM योगींच्या बहिणीची भेट घेतली, एकमेकांना मिठी मारली

शनिवार, 5 ऑगस्ट 2023 (09:58 IST)
Dehradun news: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहीण बसंती बेन उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी बहीण शशी देवी यांना त्यांच्या दुकानात भेटण्यासाठी पोहोचल्या.
 
बसंती बेन आपल्या नातेवाईकांसोबत कोठार गावाजवळील प्रसिद्ध नीलकंठ महादेव मंदिर आणि भुवनेश्वरी मंदिरात गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर परतत असताना त्या शशीदेवी यांच्या दुकानात पोहोचल्या. शशीदेवी कोठार गावात राहतात आणि 'माँ भुवनेश्वरी प्रसाद भंडार' नावाने दुकान चालवतात.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती