पेटीएम म्हणजे पे टू मोदी

गुरूवार, 8 डिसेंबर 2016 (12:21 IST)
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संसद परिसरात प्रदर्शन दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका करत म्हटले की नोटबंदी कठोर नव्हे तर मूखर्तापूर्ण निर्णय आहे. त्यांनी पेटीएम ची नवीन परिभाषा देत त्याला पे टू मोदी असे म्हटले.
राहुल यांनी म्हटले की नोटबंदीमुळे आतापर्यंत 100 हून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे गरीब आणि शेतकरी बरबाद होत आहे. मोदींनी विचार केल्याविना हा आर्थिक प्रयोग केला आहे. ज्याने केवळ कॅशलेस कंपन्यांनाच फायदा होईल.
 
नोटबंदीचा निर्णय अगदी फालतू असल्याचे म्हणत राहुल यांनी विचारले पंतप्रधान संसदेहून पळ का काढताय. त्यांनी सदनात यावे, आम्ही त्यांना समजूत देऊ. आम्ही या मुद्द्यावर वोटिंग करू इच्छितो.

वेबदुनिया वर वाचा