मुंबईच्या सहार पोलिसांनीदिल्ली येथील प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. सहार पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मोहम्मद फकरुद्दीन मोहम्मद अम्मारुद्दीन असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम 336 आणि विमान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विमान दिल्लीहून मुंबईला जात असताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित हा नोकरीसाठी मुंबईहून दुबईला जाणार होता. दुपारी साडेचार वाजता इंडिगोचे विमान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले तेव्हा एका सतर्क सुरक्षा अधिकाऱ्याने त्याची तपासणी केली. यावेळी मोहम्मद अम्मारुद्दीनला धूम्रपान करताना पकडण्यात आले. प्रत्यक्षात संशयित फ्लाइटच्या टॉयलेटमधून बाहेर येताच धूर दिसला.