केंद्राकडून मागणी नसल्याने कोविशील्डचे उत्पादन ५० टक्के कमी करणार : अदर पूनावाला

बुधवार, 8 डिसेंबर 2021 (15:41 IST)
पुढील आठवड्यापासून कोविशील्ड लसीचे उत्पादन किमान ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी घेतला आहे. फार्मास्युटिकल फर्मकडे कोविड-१९ लसीसाठी केंद्राकडून कोणतेही आदेश नाहीत, असे सांगत आफ्रिकेच्या विविध नेत्यांच्या संपर्कात आहोत. आम्ही कोवॅक्सद्वारे ४००-५०० मिलियन डोसच्या ऑर्डरची समीक्षा केली आहे. अमेरिकेने लसीच्या डोससाठी मोठी देणगी दिली आहे. त्यासाठी आम्ही तयारी करत आहोत, असे अदर पूनावाला म्हणाले.
 
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी ऑक्टोबरमध्ये सांगितले होते की, आम्ही लसींच्या निर्यातीबाबत भारत सरकारकडून योग्य सूचनांची वाट पाहत आहोत. कोवॅक्स कार्यक्रम जागतिक आरोग्य संघटना (WHO), UNICEF आणि कोअलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेयर्डनेस इनोव्हेशन (CEPI) सह Gavi वॅक्सिन संस्थेद्वारे प्रायोजित आहे. गावी स्वतः संयुक्त राष्ट्र-समर्थित संस्था आहे, जी जगभरातील लसीकरणाचे समन्वय करते. दरम्यान, भारतातील कोरोना लस कार्यक्रमाचा कणा मानल्या जाणार्‍या कोविशील्डची निर्माती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने प्रति महिना २२ कोटी डोसची उत्पादन क्षमता वाढवली आहे. अदर पूनावाला म्हणाले, सध्या आम्ही लसींच्या निर्यातीबाबत भारत सरकारकडून योग्य सूचना देण्याची वाट पाहत आहोत.
 
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे निर्मित मुलांसाठी एक कोरोना लस फेब्रुवारीपर्यंत लाँच होण्याची अपेक्षा आहे. मात्र, अदर पूनावाला यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या कंपनीत सुरू असलेल्या चाचण्यांमध्ये कोणत्याही प्रकारची घाई होणार नाही. अदर पूनावाला म्हणाले, आम्ही फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुलांसाठी कोवॅक्स लाँच करण्यास उत्सुक आहोत. सध्या आम्ही ट्रायलच्या टप्प्यातून जात आहोत. आम्ही यासाठी फास्ट-ट्रॅक चाचण्या करणार नाही, विशेषत: तसे करण्याची आवश्यकता वाटत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती