मोदींचे 7 संदेश, करोनाशी लढा देण्यासाठी सात मुद्द्यांवर साथ मागितली

मंगळवार, 14 एप्रिल 2020 (11:11 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या दरम्यान देशवासियांकडून पंतप्रधान मोदी यांनी सात मुद्द्यांवर साथ मागितली आहे.
 
१. घरातील ज्येष्ठांची जास्त काळजी घ्या, विशेष करुन ज्यांना आधीपासून आजार असतील. अशा लोकांची विशेष काळजी घ्या.
२. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन करा. घरात तयार फेस मास्क वापरा.
३. रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या नियमांचे पालन करा. घरगुती उपाय जसे गरम पाणी, काढा याचे नियमित सेवन करा.
४. आरोग्य सेतू मोबाइल अॅप डाऊनलोड करा. दुसर्‍यांनाही अॅप डाऊनलोड करण्याचा सल्ला द्या.
५. शक्य तितकं गरीब कुटुंबांची काळजी घ्या. त्यांच्या भोजनाची आवश्यकता पूर्ती करा.
६. व्यवसायिक आणि उद्योजकांनी कर्मचार्‍यांना नोकरीवरुन काढू नये.
७. डॉक्टर, मेडिकल स्टॉफ, स्वच्छता दूत, पोलिसांचा सन्मान करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती