मम्मी रागावली पबजी गेम कमी खेळ मुलगा घरातून निघून गेला

बुधवार, 3 एप्रिल 2019 (09:55 IST)
पबजी गेमचं अनेकांना वेड लागलेलं आहे. गेमच्या विळख्यात युवावर्ग अडकला आहे. मागच्या महिन्यात पबजी गेमच्या नादात असलेल्या दोन युवकांना रेल्वेने चिरडल्याची घटना ताजी असून, आता भिवंडी शहरात एका अल्पवयीन मुलाने या गेमसाठी आपलं घर सोडलं आहे. भिवंडीतील मानसरोवर येथील लेकव्ह्यू या इमारतीत राहणाऱ्या 17 वर्षीय मयुर राजेंद्र गुळुंजकर याने पबजीच्या नादात रागावून घर सोडल आहे. तो सतत पबजी गेम खेळत असल्याने त्याची मम्मी त्याला रागावली, म्हणून मयुर घर सोडून निघून गेला. 
 
मयुर हा अकरावी कॉमर्समध्ये शिकणारा 17 वर्षांचा मुलगा असून, त्याला मोबाईलवर पबजी गेम खेळण्याचं व्यसन होते. तो नेहमीच रात्रभर तो हा गेम खेळत होता. त्यामुळे बऱ्याच वेळा त्याची आई मेघा गुळुंजकर या त्याला रागवत होती. मात्र 28 मार्चला मयुर असाच मोबाईलवर पबजी गेम खेळत बसला होता. तेव्हा आईने त्याला रागावलं, त्यानंतर त्याला मेघा यांनी त्याच्या बहिणिला घ्यायला भिवंडी रेल्वे स्थानकावर पाठवलं. तो घरातून दुचाकी घेऊन भिवंडी स्थानकाकडे निघाला. तिथे पोहोचल्यावर त्याने गाडी थांबवली आणि गाडीची चावी आणि मोबाईल गाडीच्या समोरील भागात ठेऊन निघून गेला आहे.
 
त्यानंतर मयुरची बहीण नेहमीप्रमाणे स्थानकावर मयुरला फोल केला, तेव्हा तो फोन गाडीतच ठेऊन निघून गेल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर तिने घरच्यांना याबाबत माहिती दिली. घरच्यांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र मयुर कुठेही सापडला नाही. त्यामुळे त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.तो अजूनही सापडला नसून त्यांची आई व घरातील सर्व चिंतेत सापडले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती