ट्रम्प मोदींच्या 'या' निर्णयावर नाराज

शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (09:18 IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अफगाणिस्तानला मदत करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. भारताकडून आर्थिक मदत घेऊन अफगाणिस्तानात वाचनालय उभारले जात आहे. मात्र, या वाचनालयाचा कोणताच फायदा होणार नाही, असा नाराजीचा सूर ट्रम्प यांनी लावला आहे. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ट्रम्प यांनी कायम देशी धोरणांचा पुरस्कार केला आहे. अमेरिकेतील उद्योजकांनी परदेशात गुंतवणूक करण्याऐवजी स्वदेशात गुंतवणूक करण्यावर ट्रम्प प्रशासनाकडून भर दिला जात आहे. 
 
या पार्श्वभूमीवर भारताने अफगाणिस्तानला मदत देण्याचा घेतलेला निर्णय ट्रम्प यांना फारसा रुचलेला नाही. अफगाणिस्तानात वाचनालय उभारून तिकडे कोण जाणार, हा प्रश्न मला पडल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती