जलद गतीने पुढे सरकतोय मान्सून, भीषण गर्मीची लाट कायम

मंगळवार, 4 जून 2024 (13:23 IST)
देशामध्ये या वेळी भीषण उष्णतेची लाट पसरली आहे. आज देशाचे तापमान देखील वाढणार आहे. कारण आज लोकसभा निवडणूक 2024 परिणाम समोर येणार आहेत. या दरम्यान भारत हवामान विज्ञान विभाग येत्या काही दिवसांमध्ये राज्यनमध्ये उष्णतेची लाट अजून वाढणार आहे अशी शक्यता वर्तवली आहे. 
 
तसेच काही राज्यांमध्ये पाऊस देखील पडणार आहे. यादरम्यान मान्सून देखील वेळेपूर्वीच केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर जलद गतीने पुढे सरकत आहे. हवामान खात्याने  शक्यता वर्तवली आहे की, दिल्लीमध्ये 4 आणि सात जूनला पाऊस पडणार आहे. जो उष्णतेपासून आराम देईल. तसेच याशिवाय 25-35 किमी प्रति तास गतीने जलद हवा चालू शकते. 
 
गेल्या दोन दिवसांमध्ये मध्य अरब समुद्र, कर्नाटक, रायलसीमा, तटीय आंध्रप्रदेश, पश्चिम मध्य आणि पश्चिम बंगालची खाडी काही भागांमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सून पुढे सरकण्याचे वातावरण अनुकूल आहे. पूर्व मध्य बंगालची खाडी वर समुद्र तळापासून 3.1 ते 5.8 किलोमीटर वरती चक्रवाती परिसंचरण बनले आहे. जे दक्षिण-पश्चिम कडे झुकलेले आहे. 
 
मागील 24 तासांमध्ये अरुणाचल प्रदेश, मेघालय, तटीय ओडिसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दक्षिण कर्नाटक मध्ये माध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. पूर्वोत्तर भारत, केरळ, तामिळनाडू, अंदमान निकोबार, आंतरिक ओडिसा आणि मध्यप्रदेश मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. 
 
छत्तीसगढ, तटीय कर्नाटक, दक्षिण कोकण आणि गोवा मध्ये हलकासा पाऊस पडला. विदर्भामध्ये आणि बिहारमध्ये काही ठिकाणी हलकासा पाऊस झाला. तर उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि मध्यप्रदेशमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती