Madhya Pradesh CM मध्य प्रदेशच्या नवीन मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भोपाळमध्ये सोमवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. पक्षाने पाठवलेले निरीक्षक मनोहर लाल खट्टर, डॉ. के लक्ष्मण आणि आशा लाक्रा यांच्या उपस्थितीत मोहन यादव यांची राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
मध्य प्रदेशातील मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. यापूर्वी भाजप हायकमांडने मनोहर लाल खट्टर, डॉ. के लक्ष्मण आणि आशा लाक्रा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती आणि त्यांना मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी सोपवली होती. निरीक्षकांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांचे नाव निश्चित करण्यात आले.
भाजपला प्रचंड बहुमत मिळाले
मध्य प्रदेशातील विधानसभेच्या 230 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. त्याचा निकाल 30 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. निकालात भाजपने प्रचंड बहुमताने विजय मिळवला. आकडेवारीवर नजर टाकल्यास भाजपला 163 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला केवळ 66 जागांवर समाधान मानावे लागले.