जंगल बुकमधील मोगलीबाबत तर आपण ऐकलं असेलच. मोगली, लांडग्यांसोबत वाढणारा, त्यांची भाषा बोलणारा, त्यांच्यासारखा व्यवहार करणारा एक मुलगा. तसेच हा पात्र काल्पनिक आहे वा अस्तित्वात होता हे तर माहीत नाही परंतू उत्तर प्रदेशातील बहराइच जंगलात पोलिसांना दहा वर्षाची अशी मुलगी सापडली आहे वानरांच्या कळपात राहते आणि माणसांची भाषा अजिबात समजत नाही. तिचा व्यवहारदेखील जंगली जनावरांसारखा आहे.
कोणी तिला मोगली गर्ल तर कोणी जंगलातील गुडिया म्हणून हाक मारतं. बहुतेक तिने माणसं बघितलेच नसावे म्हणून माणसं बघितले की ती ओरडायला लागते, घाबरते आणि पळण्याचा प्रयत्नही करते. सध्या तिला बहराइचच्या जिल्हा रूग्णालयात भरती