शेती, ग्रामीण विकास, जल संवर्धन आणि पाण्याचा योग्य वापर ही या सरकारसमोरील सर्वात मोठी आव्हाने असून, नीती आयोगाकडून यावर काम सुरु केले आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे, ज्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे. शेती क्षेत्रातील बदलांवर (Transformation of Indian Agriculture) ही समिती काम करणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या समितीमध्ये कोण-कोण?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – संयोजक, कर्नाटकाचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी – सदस्य ,हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर – सदस्य ,अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू – सदस्य ,गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी – सदस्य ,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ – सदस्य ,मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ – सदस्य ,केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर – सदस्य ,नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद
- शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी पर्याय
- शेती बदलांमध्ये विविध राज्यांनी तयार केलेल्या कायद्यांवरही अभ्यास
- धोरणात्मक उपायांबद्दल शिफारस करणे,
- शेती क्षेत्रातील निर्यात वाढवण्यासाठी पर्याय सुचवणे,