मान्या रिक्षा चालकाची मुलगी असल्यामुळे शाळेत जाण्याची संधी तर मिळालीच नाही वरुन तरुण वयातच तिला काम करावे लागले. मला अभ्याची आवड असल्यामुळे शेवटी माझ्या वडिलांनी आईचे दागिने गहाण ठेवून मला शिकवले. वयाच्या 14 व्या वर्षी घर सोडून मान्याने दिवासाला अभ्यास केला आणि रात्री भांडी घासण्याचे काम. शिवाय ती कॉल सेंटरमध्ये देखील काम करत होती.
आज यशाच्या पायरीवर असून तिने याचे श्रेय आई-वडील आणि भावाला दिले. त्यांच्या पाठिंबा होता म्हणून Femina Miss India च्या स्टेजपर्यंत पोहोचू शकली, असे तिने म्हटले. तसेच आपला विश्वास असेल तर स्वप्न नक्कीच पूर्ण होतात असेही ती म्हणाली.