भारतामध्ये कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक

गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (16:55 IST)

कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत भारत पहिल्या स्थानावर असल्याची आकडेवारी समोर आली आहे. असोचेम आणि ईवाय यांच्या संयुक्त सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होत असला, तरी त्याचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचत नसल्याचे असोचेम आणि ईवाय यांच्या सर्वेक्षणातून अधोरेखित झाले आहे. भारतात कुपोषणग्रस्त बालकांची संख्या सर्वाधिक असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. कुपोषणाच्या विळख्यात सापडलेल्या जगातील एकूण बालकांपैकी ५० टक्के बालके भारतातील आहेत. त्यामुळे सामाजिक असमानता दूर करण्यासाठी आणि आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी धोरणांची आखणी करणे आवश्यक असल्याचे असोचेम आणि ईवायने अहवालात नमूद केले आहे.

‘देशातील ३७ टक्के बालकांचे वजन अतिशय कमी आहे. तर ३९ टक्के मुलांचे वजन त्यांच्या वयाच्या तुलनेत कमी आहे. याशिवाय उंचीच्या तुलनेत वजन कमी असणाऱ्या देशातील बालकांचे प्रमाण २१ टक्के आहे,’ असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती