मुगाची खिचडी राष्ट्रीय खाद्य नाही

गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (14:01 IST)

मुगाची खिचडी राष्ट्रीय खाद्य घोषित झाल्याचं वृत्त चुकीचं असल्याची माहिती केंद्री अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी दिली आहे. खिचडी राष्ट्रीय खाद्य घोषित होणार असल्याचं वृत्त बुधवारी प्रसिद्ध झालं होतं.

परंतु अशी कोणतीही घोषणा करण्याचा इरादा नसल्याचं स्पष्टीकरण हरसिमरत कौर बादल यांनी दिलं आहे. त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.

याआधी येत्या 4 नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या खाद्य दिनी प्रसिद्ध शेफ संजीव कपूर 800 किलो पेक्षा जास्त मुगाची खिचडी बनवून विश्वविक्रम करणार आहेत. याद्वारे भारतीय खाद्याची जगभरात ख्याती व्हावी असा याचा उद्देश आहे. मात्र याचवेळी मुगाच्या खिचडीला राष्ट्रीय खाद्य जाहीर करण्यात येईल, अशी अफवा पसरली होती .

 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती