एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने फेरीवाल्यांविरोधातील आपले आंदोलन आणखी तीव्र केले. मुंबई असो वा नवी मुंबई किंवा ठाणे, या प्रमुख शहरांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेने आपल्या स्टाईलने आंदोलनं केली. यामध्ये अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पावलंही उचलली. एकंदरीतच फेरीवाला आंदोलनाने गेल्या काही दिवसात मोठं रुप धारण केलं आहे.
मनसेच्या आंदोलनानंतर मुंबईतील अनेक रस्त्यांनी, रेल्वे स्थानकांबाहेरील जागांनी मोकळा श्वास घेतला. त्यामुळे मनसेच्या आंदोलनांना पाठिंबाही वाढत गेला. त्यात काल (1 नोव्हेंबर) काँग्रेसने फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेऊन मोर्चा रोखला. मात्र त्याचवेळी मनसेचे कार्यकर्तेही काँग्रेस कार्यकर्त्यांना भिडले आणि मोठा गोंधळ निर्माण झाला होता.