आपली सहयोगी महिला आणि विवेक सहकाऱ्यासोबत गाडीमधून घरी परतत होते. रस्त्यात पोलीस हवालदाराने त्यांना गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र विवेकने दुर्लक्ष करत गाडी पुढे नेली होती. यामुळे त्यांना संशयित समजून हवालदाराने गाडीवर गोळीबार केला. यात विवेक यांना गोळी लागली. तर त्यांच्यासोबत असलेली महिलाही जखमी झाली आहे. त्यानंतर विवेक यांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.