एचडीएफसीच्या संघवी यांची हत्या, पोलीस तपासात उघड

सोमवार, 10 सप्टेंबर 2018 (08:50 IST)
बेपत्ता एचडीएफसी उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या झालाचे पोलीस तपासात उघड झाले आहे. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून अन्य दोन जणांना ताब्यात घेतले आहे. सर्फराज शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून आणखी तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये एचडीएफसीच्या एका  बड्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. सिद्धार्थ संघवी हे 5 सप्टेंबर रोजी रात्री साडे आठच्या सुमारास कमला मिलमधील कार्यालयातून घरी जाण्यास निघाले होते. तेव्हापासून ते बेपत्ता झाले होते. संघवी यांची गाडी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सापडली होती.
 
दरम्यान, आरोपीने सिद्धार्थ उपाध्यक्षपदी वयाच्या ३७व्या वर्षीच बढती मिळाल्याच्या ईर्षेतून एका सहकाऱ्याने सिद्धार्थ संघवी यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.संघवी यांची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. नवी मुंबई पेलिसांनी पुढील तपासासाठी आरोपींना मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती