मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आवाहनानंतर मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मस्थानातील लाऊडस्पीकर बंद करण्यात आला आहे. अलीकडेच पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत, सीएम योगी यांनी धार्मिक स्थळांवर लावलेल्या लाऊडस्पीकरचा आवाज परिसराबाहेर जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानंतर मंदिर प्रशासनाने स्वतः लाऊडस्पीकर बंद करण्याचा निर्णय घेतला. श्रीकृष्ण जन्मस्थानचे सचिव कपिल शर्मा यांनी याला दुजोरा दिला आहे.
याआधी रविवारी संध्याकाळी सीएम योगी आदित्यनाथ यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्याबाबत कडक सूचना दिल्या होत्या. ते म्हणाले होते, 'प्रत्येकाला त्याच्या उपासना पद्धतीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे. धार्मिक स्थळांवर माईकचा वापर करता येईल, मात्र माईकचा आवाज त्या आवारातून बाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी. इतर लोकांची गैरसोय होऊ नये. त्याचबरोबर नवीन ठिकाणी माईक लावण्यास परवानगी देऊ नये, अशा सूचना पोलिसांना दिल्या.