Tina Dabi wedding: IAS टीना डाबी आज प्रदीप गावंडे सह जयपूरमध्ये विवाहबद्ध होणार

बुधवार, 20 एप्रिल 2022 (11:26 IST)
लोकप्रिय IAS अधिकारी टीना डाबी यांचे बुधवारी लग्न होणार आहे. राजस्थान सरकारमध्ये जॉइंट सेक्रेटरी म्हणून तैनात असलेल्या टीना जयपूरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये आयएएस प्रदीप गावंडे यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहेत. यापूर्वी तिने 2018 मध्ये जम्मू-काश्मीरचे आयएएस अधिकारी अतहर अमीर खान यांच्याशी लग्न केले पण हे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
 
प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न करणार
टीना डाबीने नुकतेच तिचे सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले होते, ज्यासाठी  बरीच चर्चा झाली होती. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असायची आणि कामासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित माहिती लोकांसोबत शेअर करत असते. 
 
टीना डाबीने तिच्या इंस्टाग्रामवर आयएएस प्रदीप गावंडे सोबतच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यानंतर 20 एप्रिलला दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली. लोकांना टीनाचा फोटो खूप आवडला आणि तिच्या आयुष्याच्या नवीन वाटचालीसाठी तिला शुभेच्छा  दिल्या.
 
टीना आणि प्रदीप कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकणार आहेत.तर , लग्नानंतर, 22 एप्रिल रोजी हे जोडपे त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांसाठी खास रिसेप्शनचे आयोजन करणार आहेत. टीनाच्या लग्नात राजस्थानचे बडे नेते आणि अधिकारी यांच्यासह अनेक हाय प्रोफाईल पाहुणे उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतही या लग्नसोहळ्याला उपस्थित राहू शकतात.
 
टीनाचा भावी पती प्रदीप गावंडे 2013 च्या बॅचचा आयएएस अधिकारी आहे. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर प्रदीपने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. ते सध्या राजस्थानमध्ये तैनात असून राज्याच्या पुरातत्व विभागात संचालक आहेत. प्रदीप मूळचे  महाराष्ट्रातील असून मराठी कुटुंबातील आहे. 
 
दुसरीकडे, टीना डाबी 2015 च्या बॅचची UPSC टॉपर आहे आणि तिची आई देखील मराठी कुटुंबातील आहे. टीनाचा पहिला नवरा अथर हा देखील यूपीएससी परीक्षेत दुसरा टॉपर आहे आणि प्रशिक्षणादरम्यान दोघेही मित्र होते. टीना आणि अतहर चे 2018 साली लग्न झाले पण नंतर दोघे वेगळे झाले. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती