छपरामध्ये वकील आणि वकिलाच्या मुलावर गोळीबार, दोघांचा मृत्यू

बुधवार, 12 जून 2024 (14:18 IST)
बिहारमधील छपरा मधून मोठी बातमी समोर आली आहे. नामांकित वकील आणि वकिलाच्या मुलाला आरोपींनी गोळ्या झाडल्या आहे. पाच जण दोन बाईकवरून हत्यार सोबत आलेत व अपराध करण्यात त्यांना यश आलं. व गोळ्या झाडल्यानंतर ते फरार झाले. परिसरातील नागरिकांनी या दोघांना रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.  
 
मिळालेल्या माहितीनुसार दोघे सकाळी आपल्या घरून कोर्टामध्ये जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळेला आरोपींनी दुदहिया पुलाजवळ या दोघांना गाठले व क्षणांचा विलंब न करीत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या मध्ये 70 वर्षीय वकिलाला एक गोळी लागली तर 26 वर्षीय वकिलाच्या मुलाला तीन गोळ्या लागल्या. ज्यामुळे दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची सूचना मिळताच पोलिस  घटनस्थळी पोहचली. याप्रकरणाची चौकशी छपरा पोलीस करीत आहे.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती