रियासी मध्ये श्रद्धाळुंनी भरलेल्या बसवर केला हल्ला, मग कठुआमध्ये केली ओपन फायरिंग आणि आता डोडामध्ये सेनाच्या पोस्ट वर केला हल्ला. सेना या हल्ल्यांना घेऊन जवाबदार आतंकवादींना शिक्षा देण्यासाठी ऑपरेशन चालवत आहे.
जम्मू-कश्मीर मध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये तीन आतंकी घटना समोर आल्या आहे. पाहली आतंकी घटना रियासी जेव्हाकी दुसरी कठुआ आणि आता तिसरी घटना डोडा मध्ये घडली आहे. डोडा मध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये आतंकवादींनी सेनाच्या बेसला आपला निशाना बनवले आहे. या हल्ल्यात सहा जवान जखमी झाले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये एकापाटोपाठ होणाऱ्या या हल्ल्यांची सुरक्षा एजन्सीला हैराण केले आहे. सध्यातरी त्या परिसरांना घेराबंदी केली आहे. जिथे आतंकवादीची लपण्याची शक्यता आहे. सेना सोबतच सर्च ऑपरेशन करत आहे.
रियासी मध्ये श्रद्धाळूंच्या बसला बनवला निशाणा
आतंकवादींनी 9 जूनला रिसायीच्या शिवखोड़ी धाममध्ये दर्शन करून परतत असणाऱ्या श्रद्धाळूंना आपला निशाणा बनवले होते. या आतंकवादी हल्ल्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता. जेव्हाकी, 33 जण गंभीर जखमी झालेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नजर ठेऊन बसलेल्या आतंकवादींनी अचानक एकापाठोपाठ एक गोळ्या झाडायला सुरवात केली. या गोळीबारामुळे घाबरलेल्या ड्रायव्हरचे बस वरचे नियंत्रण सुटले आणि बस समोर असलेल्या दरीमध्ये कोसळली.
कठुआ मध्ये आतंकवादींनी केली फायरिंग
शिवखोड़ीची घटनेला घेऊन सेना अजून सुरक्षेला मजबूत करण्याची योजना बनवतच होती की, आतंकवादींनी एका दिवसानंतर कठुआ मध्ये फायरिंग सुरु केली. कठुआ मध्ये ही फायरिंग तहसील हीरानगर च्या सोहल परिसरात केली गेली. आतंकवादींन व्दारा केला गेलेला गोळीबार सुरक्षा दलाने पूर्ण परिसर घेरलं आहे. सेनेने दिलेल्या चोक उत्तरात एक आतंकवादी मारला गेला आहे.
डोडा मध्ये सेनाच्या चौकी वर हल्ला
कठुआनंतर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत डोडा मध्ये देखील आतंकी हल्ला झाला आहे. आतंकवादींनी यावेळेस सेनाच्या बेसला आपला निशाना बनवला आहे. या गोळीबारामध्ये पाच जवान आणि एसपीओचे एक अधिकारी गंभीररित्या जखमी झाले आहे. आतंकवादींना पकडण्यासाठी या परिसरामध्ये सर्च अभियान चालवले जात आहे. सेना ने सध्या पूर्ण परिसराला घेरले आहे.या हल्ल्याला घेऊन अतिरिक्त पोलीस महानिदेशक आनंद जैन ने सांगितले की, जिल्ह्याच्या चतरगला परिसरामध्ये 4 राष्ट्रीय राइफल्स आणि पोलिसांची एक संयुक्त चौकीवर आतंकवादींनी गोळीबार केला.