लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी होणार भारताचे नवे लष्करप्रमुख

बुधवार, 12 जून 2024 (11:57 IST)
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे देशाचे नवे लष्करप्रमुख असतील. मंगळवारी (11 जून) भारत सरकारने सांगितलं की, लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे जनरल मनोज पांडे यांची जागा घेतील.
 
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना चीन आणि पाकिस्तानलगतच्या सीमांवर काम करण्याचा चांगला अनुभव आहे.
 
सध्या ते व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून काम करत आहेत.
 
द्विवेदींना सेवाजेष्ठतेनुसार या पदासाठी निवडलं गेलं आहे.
 
जनरल मनोज पांडे 30 जूनला निवृत्त होत आहेत. गेल्या महिन्यात जनरल मनोज पांडेंचा कार्यकाळ एका महिन्यासाठी वाढवला होता. ते 31 मे ला रिटायर होणार होते आणि त्याच्या सहा दिवस आधी त्यांचा कार्यकाळ वाढवला गेला होता.

Published By- Dhanashri Naik 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती