Kolkata : तरुणाला लावले मृत व्यक्तीचे दोन्ही हात

बुधवार, 19 जुलै 2023 (12:42 IST)
काही जण आपला जवळचा व्यक्ती गेल्यावर त्याचे अवयव गरजूंना दान करण्याचं काम करता. मृत व्यक्तीचे लिव्हर, डोळे, किडनी, हृदय दान केल्याचे आपण अनेकदा ऐकतो. मात्र मृत्यू नंतर शरीरातील बाहेरच्या अवयवांचे दान केलेले हाताचे प्रत्यारोपण केल्याचे प्रथम घडले आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे. 
 
कोलकाताच्या रुग्णालयात प्रथमच एका तरुणाला मृत व्यक्तीचे दोन्ही हात प्रत्यारोपित केले गेले. ही शस्त्रक्रिया तब्बल 22 तास सुरु होती.या शस्त्रक्रियेला कैडेवरिक ट्रांसप्लांट म्हणतात. हे राज्यात किंवा पूर्वी भारतात प्रथमच आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, 9 जुलै रोजी उलूबेरिया मध्ये एका 43 वर्षाच्या व्यक्तीचा अपघात झाला. अपघातानंतर या रुग्णाची प्रकृती ढासळत गेली. आणि त्यांचा मृत्यू झाला. नंतर रुग्णालयातून त्यांच्या रक्तगट आणि सेलची माहिती घेतली गेली. त्याच रुग्णालयात एका 27 वर्षाच्या तरुणाचा गेल्यावर्षीपासून प्लास्टिक सर्जरी विभागात उपचार सुरु होता. या तरुणाचा विजकांम करताना विजेचा धक्का लागून हात भाजले होते.

त्याचा हात निकामी झाला होता. त्याला दोन्ही हातांची गरज होती. रुग्णालय प्रशासनाने मयत व्यक्तींच्या कुटुंबियांना दोन्ही हात दान करण्याचे म्हटले. मयताच्या पत्नीने अखेर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेसाठी विशेष वैद्यकीय मंडळ स्थापित करून परवानगी घेतली नंतर अनेक चाचण्या करून हातांच्या  प्रत्यारोपणाची जटिल शस्त्रक्रिया करण्यात आली. 

या तरुणावर तब्बल 22 तास ही शस्त्रक्रिया चालली. 32 डॉक्टरांच्या आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पथकाने हा चमत्कार केला. नंतर तरुणाला 27 तास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सध्या हा तरुण सीसीयू मध्ये आहे.त्याचे शरीर या नव्या प्रत्यारोपणासाठी कधी प्रतिसाद देते हे पाहणे महत्त्वाचे आहे.  
 
 
Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती