In Trambakeshwar doctors and staff provide open-air services जून महिन्याच्या दुसऱ्या आठव ड्यात वादळी हवा सुरू होती त्या हवेने घरांचे छप्पर उडण्याच्या घटना घडल्या.त्यामध्ये संत निवृत्तीनाथ मंदिर परिसरात शासनाच्या आपला दवाखाना थाटलेल्या इमारतीचे छप्पर उडाले .सुदैवाने त्यात कोणाल इजा झाली नाही.मात्र अद्यापही छताचे पत्रे लटकलेल्या अवस्थेत असून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या रेटयामुळे 1 मे महाराष्ट्र दिनास आपला दवाखाना सुरू करण्यासाठी 1972 च्या दुष्काळात बांधलेले धान्य गोदाम उपलबध्द करून देण्यात आले.दगडी बांधकामातील या गादामाची दुरावस्था झालेली आहे. मात्र दवाखान्यासाठी रंगरंगोटी करून ते सजवण्यात आले.दरम्यान बुधवारी वादळी वा-यांनी हे छप्पर उडवले आहे.भिंती देखील कोसळु शकतात.