केजरीवाल यांची शुगर लेव्हल 320, अटक नंतर पहिल्यांदा दिली इन्सुलिन

मंगळवार, 23 एप्रिल 2024 (14:26 IST)
तिहाडच्या जेल मध्ये कैद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची शुगर 320 पर्यंत पोहचली आहे. यामुळे त्यांना इन्सुलिन देण्यात आले आहे. आम आदमी पार्टीने सोशल साईडवर पोस्ट मध्ये सांगितले की, शेवटी Bjp आणि त्यांचे जेल प्रशासन यांना जाग आली आणि त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना जेल मध्ये इन्सुलिन दिली. त्यांची शुगर 320 पर्यंत पोचली होती. तसेच हे भगवान हनुमानांचे आशीर्वाद आणि दिल्लीवासीयांचा संघर्ष यामुळे साक्या झाले. आम्ही सर्व आमचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत इन्सुलिन पोहचवण्यासाठी यशस्वी झालोत. 
 
डायबीईजने ग्रस्त असलेले केजरीवाल जेल प्रशासनला रोज इन्सुलिनची मागणी करीत होते. आम आदमी पार्टीने तिहाड जेल प्रशासनावर केजरीवाल यांना इन्सुलिन देत नाही म्हणून आरोप लावले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालने सोमवारी तिहाड जेलचे अधीक्षक यांना पत्र लिहून दावा केला होता की, ते रोज इन्सुलिन मागत आहे आणि एम्सच्या चिकित्सकांनी कधीही नाही सांगितले की त्यांच्या आरोग्यासंबंधित काही चिंता आहे. 
 
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पात्राच्या एक दिवसापूर्वी तिहाड प्रशासन यांनी एक जबाब दिला होता की, त्यांनी 20 एप्रिलला केजरीवाल यांची एम्सच्या वरिष्ठ विशेषज्ञ यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सची व्यवस्था केली होती. त्या दरम्यान केजरीवाल यांनी इन्सुलिन मुद्दा मांडला नाही आणि डॉकटरांनी असा काही सल्ला दिला नाही. तसेच केजरीवाल यांनी आरोप लावला की, राजनीतिक दबावमध्ये तिहाड जेल प्रशासन खोटे बोलत आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती