दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता अंमलबजावणी संचालनालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये त्यांना 2 नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यापूर्वी सीबीआयने एप्रिल महिन्यात मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी बोलावले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या नवीन मद्य घोटाळा प्रकरणीसंदर्भात ईडी केजरीवाल यांची चौकशी करणार आहे.
मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, आम आदमी पार्टीला नष्ट करण्याचा हा केंद्र सरकारचा डाव आहे. केंद्र यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. सरकार अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही मार्गाने खोटे केस उभे करून बंदिस्त करायचे आहे आणि आम आदमी पार्टीला नष्ट करायचे आहे.
भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटले आहे की, आज दिल्लीकरांच्या जीवनातील दसरा दिवस आहे जेव्हा सत्याचा विजय झाला आणि लवकरच दिल्लीला अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्ट राजवटीतून मुक्तता मिळेल. दिल्ली भाजप अध्यक्षांनी अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या समन्सचे स्वागत केले असून हा सत्याच्या विजयाचा दिवस असल्याचे म्हटले आहे.
सीबीआयच्या नऊ तासांच्या चौकशीनंतर केजरीवाल म्हणाले होते की, आप कट्टर प्रामाणिक पक्ष आहे. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले होते की, त्यांना (केंद्राला) आपचा नाश करायचा आहे. मात्र देशातील जनता आमच्यासोबत आहे.मद्य घोटाळा प्रकरण पूर्णपणे बनावट आहे.