कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद यांची सीबीआयच्या नवीन संचालकपदी नियुक्ती

रविवार, 14 मे 2023 (15:55 IST)
कर्नाटकचे पोलीस महासंचालक (DGP) प्रवीण सूद यांची भारत सरकारने केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) चे संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. प्रवीण सूद 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सीबीआय संचालकपदाच्या शर्यतीत प्रवीण सूद यांचे नाव आधीच आघाडीवर होते. 
 
शनिवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डीव्हीई चंद्रचूड आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यात उच्चस्तरीय बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची सीबीआय संचालकपदासाठी निवड करण्यात आली. 
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, "समितीने बैठक घेतली आणि मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडे तीन नावे पाठवली, त्यापैकी एक मंजूर केली जाईल. 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत कर्नाटक, दिल्ली आणि इतर राज्यांतील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांवर चर्चा झाली. सीबीआय संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा निश्चित दोन वर्षांचा कार्यकाळ 25 मे रोजी संपत आहे. 
 
मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त आणि महाराष्ट्र केडरचे 1985 बॅचचे आयपीएस अधिकारी जयस्वाल यांनी 26 मे 2021 रोजी सीबीआयची सूत्रे हाती घेतली. त्यांचा कार्यकाळ या महिन्यात संपत आहे CBI संचालकाची निवड एका समितीद्वारे केली जाते, ज्यामध्ये पंतप्रधान, CJI आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा समावेश असतो. ही नियुक्ती दोन वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी केली जाते, तर कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.  
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती