जेईई मुख्य परीक्षा 21 एप्रिलपासून होणार होती पण आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेच्या तारखेवरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. एप्रिलनंतर परीक्षा घेण्यात यावी आणि त्याचवेळी परीक्षेला बसण्यासाठी 2 ऐवजी 4संधी द्याव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती.
विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) JEE मुख्य परीक्षेच्या 2022 च्या तारखा बदलल्या आहेत. नवीन तारखांनुसार, सत्र 1 ची परीक्षा आता 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27,28 आणि 29 जून 2022 रोजी होणार आहे. त्याचवेळी सत्र 2 ची परीक्षा 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30 जुलै 2022 रोजी होणार आहे.