कबड्डीपटूची गोळ्या झाडून हत्या

बुधवार, 6 एप्रिल 2022 (16:26 IST)
पंजाबमध्ये टोळीयुद्धात एका कबड्डीपटूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कबड्डीपटू धर्मेंद्र सिंगवर पटियाला विद्यापीठाबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी टोळीयुद्धात हाणामारी झाली. धर्मेंद्र सिंह हे दौण कलानचे रहिवासी होते. पंजाबी विद्यापीठासमोरील पेट्रोल पंपामागे दोन गटात वाचावाची झाली आणि त्यानंतर गोळीबार सुरू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. फुटेजमध्ये दोन मुखवटा घातलेल्या तरुणांनी धर्मेंद्र यांच्यावर गोळी झाडल्याचे दिसून आले.
 
वैयक्तिक वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पतियाळा एसपी हरपाल सिंह म्हणाले, 'आम्ही गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. मृत आणि आरोपी दोघेही दौण कलान येथील रहिवासी आहेत. मृताच्या भावाने सांगितले की, माझा भाऊ कबड्डीपटू असून तो कबड्डीचे सामनेही आयोजित करत असे. 
 
काही दिवसांपूर्वी 14 मार्च रोजी जालंधरमध्ये आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल अंबिया यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती