हिमाचल प्रदेशात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशात, विशेषतः सर्वाधिक प्रभावित मंडी जिल्ह्यात, सततच्या मुसळधार पावसामुळे झालेल्या पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ३७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ४० लोक बेपत्ता आहे. अशी माहिती समोर आली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मते, सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMD) अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये ७ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD ने ५ जुलै रोजी शिमला, सोलन आणि सिरमौर आणि ६ जुलै रोजी उना, बिलासपूर, हमीरपूर, कांगडा, चंबा आणि मंडीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.