इंडिगोच्या पायलटची विमानात 'कृपाण' नेण्याच्या परवानगीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव

बुधवार, 13 डिसेंबर 2023 (15:21 IST)
इंडिगोच्या एका वैमानिकाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, फ्लाइट दरम्यान कृपाण घेऊन जाण्याची परवानगी मागितली आहे. त्यांनी उच्च न्यायालयाला यासंदर्भात केंद्र सरकारला निर्देश देण्याची विनंती केली आहे.
 
पायलट अंगद सिंग यांनी नागपूर खंडपीठासमोर दाखल केलेल्या याचिकेत दावा केला आहे की, त्यांना किरपाण बाळगण्याचा अधिकार आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय यांच्या खंडपीठाने याप्रकरणी केंद्र सरकार आणि विमान कंपनीला नोटीस बजावून त्यांची प्रतिक्रिया मागवली आहे. खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 जानेवारी रोजी निश्चित केली आहे.
 
2022 मध्ये सूचना जारी केल्या होत्या
पायलटचे वकील साहिल श्याम देवानी म्हणाले की नागरी उड्डाण मंत्रालयाने लादलेल्या निर्बंधांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, कारण 12 मार्च 2022 रोजी सरकारने शीख प्रवाशांना विशिष्ट आकाराच्या कृपाण बाळगण्याची परवानगी देणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. हे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती