ऑपरेशन सिंदूरमुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय सैन्याने पूर्णपणे हाणून पाडला.
गुरुवारी रात्री ८ ते १० वाजण्याच्या दरम्यान पाकिस्तानने लढाऊ विमाने, ड्रोन, रॉकेट आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून जम्मू, पठाणकोट, फिरोजपूर, कपूरथळा, जालंधर आणि जैसलमेर येथील लष्करी तळांवर आणि शस्त्रास्त्र केंद्रांवर हल्ला केला.
तसेच भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानची चार लढाऊ विमाने पाडली. यामध्ये अमेरिकेत बनवलेल्या दोन एफ-१६ आणि चीनमध्ये बनवलेल्या दोन जेएफ-१७ विमानांचा समावेश आहे. जैसलमेरमध्ये पाडण्यात आलेल्या एफ-१६ च्या दोन्ही वैमानिकांना आणि अखनूरमध्ये पाडण्यात आलेल्या दुसऱ्या विमानाला लष्करी दलांनी ताब्यात घेतले. अशी माहिती समोर आली आहे.