प्राप्तिकर विभागाने चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बहल आणि अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsee Pannu) यांच्या घरावर छापा टाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा छापा फँटम फिल्मसशी संबंधित आहे. आयकर विभागामार्फत मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) जनसंपर्क अधिकारी आनंद तिवारी म्हणाले की फॅन्टम फिल्म्सच्या ठिकाणीही छापे टाकण्यात आले आहेत. यासह प्राप्तिकर विभागाने निवेदनात म्हटले आहे की, मुंबईतील चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेता तापसी पन्नू यांच्या मालमत्तांवर आयकर छापेमारी करण्यात आली आहे.