सर्वोच्च न्यायालयचा महत्वपूर्ण निर्णय : शालेय प्रवेशासाठी आधार आवश्यक नाही

बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (13:58 IST)
सीबीएसई, नीट आणि यूजीसी परीक्षा आणि शालेय प्रवेश प्रक्रियेसाठी आधार कार्ड आवश्यक नाही, असा महत्वपूर्ण निर्णय शिक्षणक्षेत्र आणि आधार यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय सुनावत असताना म्हटलं आहे की, सीबीएसई, नीट आणि यूजीसी परीक्षेसाठी आधार कार्ड असणे अनिवार्य करू शकतं नाही. तसेच शालेय प्रवेशासाठीही आधार असणे बंधनकारक नाही. न्यायाधिश सीकरी यांनी म्हटलं आहे की, कोणत्याही मुलांस आधार कार्ड किंवा आधार नंबर नसल्याने शैक्षणिक सुविधा आणि लाभ याच्यापासून वंचित ठेवू शकतं नाही.
 
शालेय प्रवेशासाठी आधार कार्ड आवश्यक नाही हा निर्णय ज्या विद्यार्थ्यांजवळ किंवा त्याच्या आई-वडिलाजवळ आधार नाही अशासाठी मोठा दिलासा देणारा आहे. सीबीएसई, नीट आणि यूजीसी परीक्षेच्या रजिस्ट्रेशनसाठी याआधी आधार आवश्यक होतं तर काही राज्यात याबाबतीत सूट दिली होती, मात्र सीबीएसई, नीट आणि यूजीसी परीक्षा रजिस्ट्रेशनसाठी आधार आवश्यक नाही, असा निकाल आज उच्च न्यायालयाने दिल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती