ही लिंक आली असेल तर चुकूनही क्लिक करू नका; एसबी आय ने इशारा दिला

सोमवार, 23 मे 2022 (15:32 IST)
एसीबीआय मध्ये खातं असल्यास चुकून देखील या लिंक वर क्लिक करू नका नाहीतर आपले बँकेचे अकाउंट रिकामे होईल असे आवाहन एसबीआय ने केलं आहे. असा मॅसेज  आल्यावर त्याकडे दुर्लक्षित करण्याचे आवाहन एसबीआय ने केलं आहे. 
 
एसबीआय ने सांगितलं आहे की  बँकेच्या नावाने आलेला मॅसेज ''प्रिय ग्राहक, तुमचे एबीआय डॉक्युमेंट एक्स्पायर झाले आहे. आपले अकाउंट ब्लॉक करण्यात येईल. अकाउंट अनब्लॉक करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंकवर क्लिक करा. '' असा मेसेज आल्यास हा मॅसेज त्वरित डिलीट करा. आलेल्या मॅसेजच्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. नाहीतर आपल्या बँकेतील अकाउंट मधील पैसे काढले जातील. बँक अशा रकाराचे कोणतेही मॅसेज पाठवत नाही. म्हणून वेळीच खबरदारी घेण्याचे आवाहन एसबीआय ने केलं आहे.  
 
असे मेसेज वर क्लिक केल्याने आपला सर्व डेटा लीक होऊ शकतो. सायबर गुन्हेगार आपली व वैयक्तिक माहिती मिळवून आपल्या बँकेच्या खात्यातील पैसे काढतात. म्हणून बँक वेळोवेळी सावध करते की  आपल्या बँकेची वैयक्तिक माहिती, पिन नंबर , पासवर्ड, ओटीपी कोणालाही सामायिक करू  नये. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती