बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे 16 मजुरांना जम्मू-काश्मीरला घेऊन जाणारा ट्रक उलटला. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काहीजण तेथे जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. ट्रक सिलीगुडीहून जम्मू-काश्मीरला जात होता, असे सांगण्यात येत आहे. पूर्णियाच्या जलालगडमध्ये ते नियंत्रणाबाहेर गेले. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतदेह घटनास्थळावरून काढून पोस्टमार्टमसाठी पाठवले जात आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ट्रकमध्ये लोखंडी पाईप होते. ट्रक अनियंत्रित होऊन पलटी झाल्याने मजूर या पाईपखाली दबले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला.