छत्तीसगडच्या मुंगेली मध्ये माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट घडली आहे. जिथे एक महिला सरपंच आपल्या 3 वर्षाच्या मुलीला जंगलात सोडून आली. सांगितले जात आहे की या मुलीचा शोध घेण्यात आला. पोलिसांना तिचा मृतदेह मिळाला. अन्न-पाणी मिळाले नसल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाला आहे. हे पूर्ण प्रकरण मुंगेली जिल्ह्यातील लोरमी क्षेत्रातील खुडिया परिसरातील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील गाव पटलपरहाची महिला सरपंच हिचे आपल्या पतीसोबत कडाक्याचे भांडण झाले. पण या भांडणाचे परिणाम 3 वर्षाच्या चिमुकलीला भोगावे लागले. पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर ती महिला सरपंच आपली 3 वर्षाची मुलगी आणि 1 वर्षाचा मुलगा यांना सोबत घेऊन घरातून निघून गेली. तिचे माहेर गावापासून 25 किलोमीटर असल्याची माहिती मिळाली. डोक्यात राग असल्याने या महिलेले आपल्या मुलीला जंगलात सोडून दिले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोध सुरु केला. चार दिवसाच्या शोध मोहीम नंतर पोलिसांना त्या चिमुकलीचा मृतदेह मिळाला. अन्न-पाणी मिळाले नाही म्हणून या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. या चिमुकलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.