समाजामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची मनाली जाते. शिक्षक हे उद्याचे उज्वल भविष्य घडवत असतात.ते मुलांना शिकवण्यासोबत चूक आणि बरोबर यांमधील फरक समजावत असतात. पण बिहारमधील बेगूसराय मधून एक बातमी समोर आली आहे. जिथे एका खाजगी शाळेतील शिक्षकाने हिंदूंचे पूजनीय दैवत हनुमाजींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेगुसराय येथील एका खासगी शाळेतील एका मुस्लिम शिक्षकाने वर्गात शिकवत असताना हिंदूंचे पूजनीय भगवान हनुमानजींबद्दल अत्यंत वाईट विधान केले. त्यांनी वर्गात शिकवत असताना हनुमानजी मुस्लिम समाजातील असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर हनुमानजी नमाज वाचत असत असे शिक्षकाने सांगितले.
शिक्षकाच्या या दाव्यानंतर शाळेत एकच खळबळ उडाली होती. मुलांनी घरी येऊन हा सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यामुळे पालक संतप्त झाले. आणि लगेचच शाळेत पोहोचून आक्षेप घेतला. गोंधळ वाढत असल्याचे पाहून शिक्षकाने माफी मागितली. तसेच शिक्षकाने माफी मागितल्यानंतर प्रकरण शांत झाले असून शाळा व्यवस्थापनानेही शिक्षकाला ताकीद दिली आहे.