#MeToo कँपेनमध्ये आरोप ज्यांच्यावर झाले त्यांच्यावर कठोर कारवाई

#MeToo कँपेनमध्ये अनेक महिलांनी स्वत:वर झालेल्या यौन शोषणाच्या विरोधात जी प्रकरणे बाहेर आली आहेत त्यावर  मोदी सरकार  विरोधात कठोर कारवाई  केली.  केंद्र सरकारने या प्रकरणात चौकशीसाठी एका समितीचं गठन केली असून, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. ही समिती कायद्याच्या आधारे महिलांच्या शोषणा संबंधित प्रकरणाशी निपटण्यासाठी काम करणार आहे.

#MeToo चळवळीमुळे या समितीचं गठन करण्यात आलं आहे. एमजे अकबर यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना देखील परराष्ट्र राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.या समितीमध्ये परिवहन मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी यांचा समावेश आहे.गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, यौन शोषण संबंधित प्रकरणात हे मंत्री लक्ष घालणार आहेत.  आतापर्यंत अभिनेता आलोक नाथ, दिग्दर्शक सुभाष घई, साजिद खान, रजत कपूर या सारख्या व्यक्तींवर गंभीर आरोप झाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती