जिल्हा परिषद च्या शाळेत वर्ग 5 ते 10 मध्ये 320 विद्यार्थी शिक्षण घेत आहे येथिल माध्यमिक विद्यालय मध्ये 11 शिक्षकांची पदे मंजूर असतांना केवळ दोन शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे या संदर्भात पालकांनी शिक्षण विभाग कडे वारंवार लेखी निवेदन दिले मात्र शाळेला शिक्षक मिळाले नाही.
शाळेत केवळ दोन शिक्षक कार्यरत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनचे शैक्षणिक नुकसान होत आहे असे पालकांनी म्हटले मात्र शिक्षण विभागाने कुठलीच दखल घेतली म्हणून पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही असा पवित्रा घेतला त्यामुळे पालकांनी आणि गावकऱ्यांनी 7 दिवसापासून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे बंद केले आहे.