पुण्यात विमानतळावर वॉश बेसीनमधून आणले तब्बल ५३ लाख रुपयांचे सोने

मंगळवार, 18 जून 2019 (09:49 IST)
अरब देश असलेल्या दुबईहून पुण्यात आलेल्या विमानाच्या वॉश बेसीनमधून आणलेले १४ सोन्याचे बिस्किट सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनीटच्या पथकाने जप्त केले आहेत. या सोन्याचे किंमत तब्बल  ५२ लाख ९९ हजार रुपये असून, दुबईहून पुण्याला येणारे जेट एअरवेजचे एसजी ५२ हे विमान आज पहाटे पुणे विमानतळावर उतरले होते.
 
या विमानाच्या आतील वाश बेसीनजवळच्या एका खोबणीत चिकटपट्टीने सोन्याचे सर्व बिस्कीट चिकटवली होती. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी हे सोने जप्त केले आहेत. यामध्ये १४ सोन्याचे बिस्कीट सापडली आहेत. या बिस्कीटांवर विदेशातील सीरीयल मार्क असून, सोन्याच्या बिस्कीटांची किंमत बाजारभावाप्रमाणे ५२ लाख ९९ हजार रुपये आहे.
 
कारवाई कस्टमचे उपायुक्त महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक्षक माधव पलीनीतकर, विनीता पुसदकर, निरीक्षक बालासाहेब हगवणे, चैतन्य जोशी आणि आश्विनी देशमुख, तसेच हवालदार संदिप भंडारी आणि ए. एस. पवळे यांच्या पथकाने केली आहे. मात्र हे कोणी आणले हे अजून समोर येऊ शकले नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती