General Manoj Pande: जनरल मनोज पांडे बनले 29 वे लष्करप्रमुख, जाणून घ्या नवीन लष्करप्रमुखांबद्दल?
शनिवार, 30 एप्रिल 2022 (18:13 IST)
जनरल मनोज पांडे यांनी शनिवारी भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. आता ते जनरल एमएम नरवणे यांच्या जागी भारतीय लष्कराची जबाबदारी स्वीकारताना दिसणार आहेत. जनरल मनोज पांडे हे 29 वे लष्करप्रमुख असतील. यापूर्वी जनरल मनोज पांडे हे उपलष्कर प्रमुख होते. जानेवारी 2022 मध्ये त्यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. अशा परिस्थितीत जाणून घ्या भारताच्या नव्या लष्करप्रमुखांच्या लष्करी प्रवासाविषयी?
General Manoj Pande, PVSM, AVSM, VSM, ADC takes over as the 29th #COAS of #IndianArmy from General MM Naravane.
जनरल मनोज पांडे, परम विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल, ऐड डि कैंप ने जनरल एम एम नरवणे से #भारतीयसेना के 29वें #सेनाध्यक्ष का पदभार संभाला। pic.twitter.com/Mphsz1pvrP
भारतीय लष्कराच्या लष्करप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर, मनोज पांडे हे लष्करप्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले अभियंता ठरले आहेत. मनोज पांडे लष्कर प्रमुख बनणारे कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स (सॅपर्स) चे पहिले अधिकारी ठरले आहेत. आतापर्यंत सॅपर्सच्या अधिकाऱ्यांनी कमांडर आणि व्हाईस चीफ म्हणून काम केले आहे, पण लष्करप्रमुख म्हणून ही पहिलीच वेळ आहे.
जाणून घ्या कोण आहेत नवे लष्करप्रमुख?
6 मे 1962 रोजी जन्मलेले मनोज पांडे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (NDA)माजी विद्यार्थी आहेत. डिसेंबर 1982 मध्ये त्यांना कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्समध्ये सामील करण्यात आले.
ते इंडियन मिलिटरी अकादमी (IMA),डेहराडूनचे माजी विद्यार्थी देखील आहेत. IMA मधून उत्तीर्ण झाल्यानंतर डिसेंबर 1982 मध्ये बॉम्बे सॅपर्समध्ये त्यांची नियुक्ती झाली.
जनरल मनोज पांडे यांनी स्टाफ कॉलेज, यूके येथून पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी हायर कमांड आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजमधूनही शिक्षण घेतले आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांनी नियंत्रण रेजिमेंटजवळ इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले.
मनोज पांडे ईस्टर्न कमांडचे कमांडिंग ऑफिसर राहिले आहेत आणि त्यांनी अंदमान-निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ म्हणूनही काम केले आहे.
39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत, जनरल पांडे यांनी सर्व प्रकारच्या भूप्रदेश, पारंपारिक तसेच विरोधी बंडखोरी ऑपरेशन्समध्ये प्रतिष्ठित कमांड आणि स्टाफ असाइनमेंट्स सांभाळल्या आहेत.
मनोज पांडे यांना विशिष्ठ सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ठ सेवा पदक, चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमांडंट आणि दोन वेळा सी कमंडेशन मध्ये GOC ने सन्मानित करण्यात आले आहे.