फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना झालेल्या मोठ्या तोट्यानंतर जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत मोठे फेरबदल झाले आहेत. यामुळे भारतीय उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी या यादीत 10व्या स्थानावर आले आहेत. आज रिलायन्सचे शेअर्स कमी झाल्यानंतर अचानक गौतम अदानींनी मुकेश अंबानींना मागे टाकले.
रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी आता जगातील अब्जाधीशांच्या यादीत 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत. अदानींनी अंबानींच्या पुढे झेप घेतली. अहवालानुसार, शुक्रवारी शेअर्समध्ये झालेल्या उलथापालथीमुळे अंबानींच्या संपत्तीत 2.14 टक्के म्हणजे $2 बिलियनची घट झाली.