जम्मू जिल्ह्यातील अखनूरहून गार मजूरला जाणारी बस उलटली, 50 प्रवासी जखमी

शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (22:28 IST)
जम्मू जिल्ह्यातील अखनूरमध्ये बस उलटली. यात शाळकरी विद्यार्थिनींसह 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि स्थानिक लोक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.
 
अखनूरहून गर मजूरला जाणारी बस रामीन माखिन गावाजवळ रस्त्याच्या कडेला उलटली, बस मध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे हा अपघात झाला. अपघातामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. पोलिस कर्मचाऱ्यांसह आजूबाजूच्या लोकांनी माहिती मिळताच प्रवाशांना बाहेर काढले.
 
यानंतर त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात चौकी चौरा येथे उपचार करण्यात आले. तेथून चार गंभीर जखमींना अखनूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. 

Edited  By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती