राजस्थानात महिलेवर 23 जणांचा बलात्कार

बिकानेर- एका ‍महिलेला कारमध्ये लिफ्ट दिल्यानंतर रस्त्याच्याकडेला नेऊन तिच्यावर 23 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानच्या बिकानेरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे.
 
सदर तरुणी दिल्लीतील राहणारी आहे. 25 सप्टेंबर रोजी ही तरुणी बिकानेरच्या रिदमलसार पुरोहितन परिसरात आली होती. परतताना तिला दोघाजणांनी एसयूव्ही कारमध्ये लिफ्ट दिली. थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांनी तिला खेचत रस्त्याच्याकडेला नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर ‍त्यांनी त्यांच्या काही मित्रांना बोलावून घेतले. त्यांनीही या तरुणीवर बलात्कार करुन पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
या महिलेने बिकानेरचे पोलिस अधीक्षक सवाई सिंह गोडारा यांची भेट घेऊन त्यांना झाला प्रकार कथन केला. त्यानंतर जयनारायण व्यास कॉलनी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. बलात्कार करण्यार्‍यांपैकी दोघांना नावाने ओळखत असल्याचे या तरुणीने सांगितल्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या आरोपींना अटक केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती